सुशांत मृत्यूनंतरच्या राजकारणाचा भाजपच्या प्रतिमेवर परिणाम नाही

 

पुणेः वृत्तसंस्था । ‘सुशांतसिंह राजपूत मृत्यूची सीबीआय चौकशी सुरू आहे. या घडामोडींचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही, असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील सरकार आम्ही पाडणार नाही. हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय घालून पडले तर आमचा दोष नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

राज्यात सुशांतसिंहवरून पुन्हा राजकारण तापलं असतानाच भाजपनं महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचल्याचं आरोप सातत्यानं होतं आहेत. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पक्षाची बाजू सावरत टीकाकारांना सुनावलं आहे.

एम्सचा अहवाल आल्यानंतर सुशांतनं आत्महत्याचं केल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाजपलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

 

कृषी सुधारणा कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कृषी विधेयकाबद्दलही मत मांडले आहे. ‘केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठीच काँग्रेससह विरोधकांनी कृषी सुधारणा कायद्याबाबत अपप्रचार केला आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं हे काँग्रेसला पचत नाही,’ असा आरोप भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतरही देशात किमान हमी भावाप्रमाणे शेतमालाची खरेदी होईल . सरकार बाजार समित्या बंद करणार नाहीत या उलट बाजार समितीतून शेतकरी मुक्त होतील या बिलामुळे शेती क्षेत्रात उर्जितावस्था येईल केंद्र सरकारने स्वामिनाथन समितीच्या ९० टक्के शिफारशी लागू केल्या. असेही ते म्हणाले .

Protected Content