Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुशांत भैयाची हत्या झालीय ; माजी असिस्टंटचा खळबळजनक आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) मी सुशांत भैयाला चांगले ओळखतो, ही आत्महत्या आहे यावर माझा विश्वास नाही. ही निश्चितच हत्या आहे. एवढेच नव्हे तर, सुशांतची हत्या त्याच्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आल्याचा खळबळजनक दावा, त्याचा माजी असिस्टंट अंकित आचार्यने केला आहे.

 

अंकित आचार्यने म्हटले आहे की, सुशांत आत्महत्या करु शकत नाही. मी सुशांत भैयाला चांगले ओळखतो, ही आत्महत्या आहे यावर माझा विश्वास नाही. ही निश्चितच हत्या आहे. जर आपण मान्य केले ही आत्महत्या आहे मग सुशांतच्या गळ्याभोवती ओ मार्क कसा आला? जेव्हा कोणी आत्महत्या करतो त्याच्या गळ्याभोवती यु शेप येतो, जर सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्याचे डोळे आणि जीभ बाहेर कशी आली नाही?, असा प्रश्न उपस्थित करत, तो हे प्रकरण सोडवू शकतो, असा दावा देखील अंकितने केला आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येची फोटो मी बघितले आहेत. सुशांत राजपूतच्या गळ्यावरील निशाण त्याचा कुत्रा फजच्या बेल्टचे आहे. आरोपींनी त्या कुत्र्याच्या बेल्टने सुशांतची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप देखील अंकितने केला आहे.

Exit mobile version