Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुशांत आत्महत्या : सरकारने तपास सीबीआयकडे सोपवावा ; फडणवीस यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी अनेकांची मागणी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वागणुकीकडे बघितल्यावर तसे होणार नाही. पण याप्रकरणी ईडीने तरी ईसीआयआर दाखल करुन मनी लॉन्ड्रिंग आणि मनी ट्रेलिंगबाबत चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांची कायदेशीर पातळीवरही कोंडी केली आहे. परवानगी न घेता आणि स्थानिक पोलिसांना न कळवता तपास केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना कायदेशीर समज दिली आहे.

Exit mobile version