Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुशांतने सांगितले होते, रिया खूप त्रास देते, तिच्या सोबतच्या रहायचे नाही ; अंकिता लोखंडेंचा जबाब

मुंबई (वृत्तसंस्था) रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचे नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचे आहे. मला काही सुचत नाही, असे सुशांतचे म्हणणे होते, असा खळबळजनक खुलासा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने बिहार पोलिसांकडे केला आहे.

 

 

बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर रिया चर्कवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जबाब नोंदवण्यासाठी गोरेगाव येथील अंकिताच्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला. यावेळी अंकिताने सांगितले की, मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझे अभिनंदन केले. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचे नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचे आहे. मला काही सुचत नाही, असे सुशांतच म्हणणे होते, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली. तसेच, त्यानंतरही अनेकदा सुशांतने व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा मारताना मला रियाबाबत सांगत होता, असेही अंकिताने सांगितल्याचे कळते.

Exit mobile version