Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुशांतच्या तपासात सुप्रीम कोर्ट सांगेल तसे करू गृहमंत्री

मुंबई, वृत्तसंस्था । ‘सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं काम करत आहेत,’ असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. सरकारची यापुढची भूमिका काय असेल हेही देशमुख यांनी सांगितलं.

सुशांतसिंह तपासात ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते त्या आधारावर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. सुशांतसिंह आत्महत्या तपासात मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असून ते हलगर्जीपणा करत आहेत,’ असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचंही भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळं तपास राज्य सरकारनं सीबीआयकडे द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. केंद्र सरकारनं स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली असली तरी राज्य सरकारनं अद्याप हा तपास सीबीआयकडे सोपवलेला नाही.

Exit mobile version