Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुशांतच्या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरु : अनिल देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरु आहे अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये चांगलेच जुंपले असल्याचे चित्र आहे.

 

 

‘एएनआय’सोबत बोलतांना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने सुरु आहे. दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह पहिल्यांदाच मीडियासमोर आले. आमचा तपास योग्य दिशेने असून बिहार पोलिसांनी ही केस आमच्याकडे ट्रान्सफर करायला हवी होती, असे म्हटले आहे. दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातील संघर्षही वाढला आहे.

Exit mobile version