Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरक्षा व प्रभावाची माहिती नसल्याने भारत बायोटेक , सीरमला परवानगी नाकारली

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकचे कोरोना लस मंजुरीचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

“लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल पुरेसा डाटा दिलेला नाही, त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. त्यांना अजून डाटा सादर करायला सांगितला आहे” असे सूत्रांनी सांगितले.

CDSCO च्या समितीने फायझर, सीरम आणि भारत बायोटेकच्या अर्जाचा आढावा घेतला. “अनेक बैठका ही एक ठरलेली स्टँडर्ड प्रॅक्टीस आहे. एक ते दोन आठवडे ही प्रक्रिया चालेल” असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील सूत्राने सांगितले.

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

सध्यातरी लस हाच या आजाराला रोखण्यााच एकमेव मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काल एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना आता लसीची जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही, असे सांगितले आहे.

Exit mobile version