Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुभाष चौकात विवाहितेचे सव्वा लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले; शनीपेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुभाष चौकातील ज्वेलरी खरेदी करण्यासाठी माहेरी आलेल्या विवाहितेच्या पिशवी कापून पिशवीतील १ लाख २२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे २३ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शहारातील पारख नगर येथील माहेर असलेल्या माला राकेशकुमार मालानी (वय-५३) रा. कालानीनगर, इंदौर मध्यप्रदेश ह्या जळगाव येथे भावाकडे भेटण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी आल्या. दुपारी ४ वाजता  माला मालानी ह्या त्यांच्या भावजायीसोबत सुभाषचौकातील आरसी बाफना नयनतारा ज्वेलर्स येथे त्यांनी १ लाख २२ हजार ८०९ रूपये किंमतीचे ब्रासलेट व कानातील टॉप्स असे सोन्याचे दागिने खरेदी केले. त्यानंतर सिल्वर शोरूम येथे दुपारी ४.४५ वाजता पोहचले. दुकानावर पोहचताच त्यांना पिशवीत दागिने पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. विवाहितेच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अभिजित सैंदाणे करीत आहे. 

 

Exit mobile version