Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुफी संतांची बदनामी करणाऱ्या टि. व्ही. अँकरला अटक करा ; सावदेकरांची मागणी

 

सावदा ता. रावेर, प्रतिनिधी । सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल बदनामी व अनुदूगार काढणाऱ्या न्युज 18चे मॅनेजिंग एडिटर अमीष देवगन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी सावदा येथील नागरीकांनी केली आहे.

न्यूज 18 चे मॅनेजिग एडीटर व एंकरअमीष देवगन यांनी दि. १६ जून रोजी सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल एका टीवी शोमध्ये अनुदूगार तिरस्कारी व अपमानस्पदशब्द असे शब्द वारंवार वापरले. यातून त्यांनी जातीवादी द्वेष निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सर्व मुस्लीम समाजाची भावना दुखावलली आहे. सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या समाधीवर सर्व समाजाचे लोक जाऊन आशीर्वाद घेवुन मनोकामना पुर्ण करतात व त्यांच्या उर्स पुण्यतिथीत आपल्या देशाचे प्रधानमंत्री ,विरोधी पक्ष व अनेक राज्याचे मुख्यमंत्र्याकडुन चादर अर्पण करुन आर्शवाद घेतले जातात. अशा संत व जागृत सुफी माहात्म्याबाबत अपशब्द वापरून टी.व्ही.चॅनेलची टी.आर.पी. वाढवण्यासाठी व देशाची शांतता व दोन समाजात द्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची शांतता भंग करणाऱ्या टी.व्ही.अॅकरवर गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करावी. अशा टी. व्ही.चॅनलवर त्वरीत बंदी आणावी. अशी मागणी सावदा येथील नगरसेवक फिरोजखान पठाण , फिरोज लेफ्टी, फरीद नुरोद्दीन, अमजदरवान, फिरोज शेख ,अलीम शेख , अमीरशेख ,शेख राजा मेहताब भाई आदींनी केली आहे.

Exit mobile version