Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रीम कॉलनीत गुरांची चामडी, हाडे साठवणाऱ्या दोन जणाना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी येथे बेकायदेशीरपणे गुरांच्या चामडी तसेच हाडांची साठवणूक केल्याप्रकरणी तीन जणांवर शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ८ लाख ३ हजार ४०० रुपयांचे गुरांची चामडी व हाडे जप्त करत विल्हेवाट लावली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कॉलनीत ममता बेकरी जवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये गुरांची चामडी साठवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील, पोलीस नाईक विकास सात दिवे, पंकज पाटील, राहुल रगडे , विशाल कोळी यांच्या पथकाने सुप्रीम कॉलनी छापा टाकला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने सुप्रीम कॉलनीत छापा टाकला. या ठिकाणी तब्बल आठ लाख , तीन हजार चारशे रुपये किमतीचे .. गुरांचे चामडी मिळून आली. डंपर मधून आव्हाने शिवारात चामडी नेण्यात आले व त्या ठिकाणी खड्डापुरवून त्यात तिची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शेड तसेच जागा मालक सरवत सुलतान शेख कुरेशी यांच्यासह बेकायदेशीरपणे गुरांची चामडी व हाडे साठवून ठेवणाऱ्या अरबाज मुस्ताक कुरेशी, शेख मुजफ्फर शेख मोहम्मद दोन्ही रा. पिंप्राळा हुडको यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version