Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रिया सुळे संतापल्या

मुंबई: वृत्तसंस्था । हाथरस येथील सामूहिक बलात्कार व खून गुन्ह्यातील पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पायी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.

‘यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे,’ . ‘कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे… बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ऍक्शन घेतली पाहिजे. राहुल गांधी हे संसदेचे सदस्य आहेत. त्यांच्याशी असं वर्तन केलं जाणार असेल, असेल तर त्याचा जाहीर निषेध करते, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या किंवा एखाद्याच्या भेटीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची वा कुठल्याही व्यक्तीची पोलिसांनी कॉलर धरणं कितपत योग्य आहे, असा सवाल सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे. ‘केंद्र सरकारच्या बेटी बचावो, बेटी पढावो या योजनेच्या नेमका उलटा कारभार यूपीमध्ये सुरू असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.

Exit mobile version