Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रिम कॉलनीत लोखंडी चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्याला अटक;

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परिसरात हातात लोखंडी चॉपर घेवून नागरीकामध्ये दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपी पिण्याला एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी १६ जून रोजी रात्री ८ वाजता सुप्रिम कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर उर्फ पिण्यात रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. मच्छी मार्केट, सुप्रिम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

 

सार्वजनिक ठिकाणी हातात शस्त्र घेवून फिरण्यास मनाई असतांना शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील दिनकर उर्फ पिण्या हा हातात लोखंडी चॉपर घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातचे पोलीस उपनिरीक्षक गिरासे यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी १६ जून रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शोध पथकाने कारवाई करत संशयित आरोपी पिण्या उर्फ दिनकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत केला आहे. संशयित आरोप दिनकर उर्फ पिण्या याच्यावर यापुर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबर ललील नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Exit mobile version