Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रिम कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परिसरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील एका भागात १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने पिडीत मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले. मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आलेली नाही. दुपारी १ वाजेच्या सुमारास मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

Exit mobile version