Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुधर्मा व मनशक्ती परिवाराचा संयुक्त उपक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सुधर्मा सामाजिक संस्थेने शहर परिसरातील अत्यंत गरीब 200 शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले आहे. अशाच सावखेडा बुद्रुक येथील ५ व समता नगर येथील १ अशा एकूण सहा विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले.

यामध्ये १ किरण विकास सोनवणे (९वी) २ प्रेम हिरामण पवार (१०वी) ३ तेजस्विनी कैलास सोनवणे (८वी) ४ पायल अनिल शिरसाट (८वी) ५ कशीश दीपक सोनवणे (८वी) ६ तुषार चंद्रकांत तायडे (१०वी) या विद्यार्थ्यांना संभाजीनगर येथील दत्त मंदिरात झालेल्या छोटेखामी कार्यक्रमात या सायकली देण्यात आल्या.

या सर्व विद्यार्थ्यांची सायकलीमुळे ७ ते ८ किलोमीटरची पायपीट वाचली असून साहजिकच विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्यामुळे खूप आनंद झाला. सुधर्मा संस्था आपल्या शिक्षणातील सर्व अडचणी दूर करेल असे प्रतिपादन सुधर्मा अध्यक्ष हेमंत बेलसरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या सर्व सायकली मनसक्ती परिवार सदस्य अभय खांदे, कोमल जैन, मुकुंद शिंपी, नितिन पाटील व सावरिया ओ झा यांचे तर्फे देण्यात आल्या. सुधर्मा सचिव दिनकर बाविस्कर यांनी आभार मानले. सूर्यकांत हिवरकर नाना चव्हाण व अभय खांदे उपस्थित होते. सुधर्माने आतापर्यंत १५० चे वर सायकली समाजाच्या मदतीने मुलांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

छायाचित्रात सुधर्माचे गरीब विद्यार्थी सायकलसह आणि सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे ,अभय खांदे, सूर्यकांत हिवरकर, नाना चव्हाण आणि दिनकर बाविस्कर यांच्यासोबत.

Exit mobile version