Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुकी मध्यम प्रकल्पाच्या कामांची माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सुकी मध्यम प्रकल्पाचे २२ लाख रूपये खर्चून पाटचारी व विविध कामे होत आहे. मात्र या कामांची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याची आरोड असून या अधिकाऱ्यांवर कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रावेर तालुक्यातील सुकी मध्यम प्रकल्प अनेक शेती सोबत गावकऱ्‍यांची तहान भागवीणारे एकमेव महत्वाचे धरण परंतु येथे सुरु असलेल्या कामांमुळे हा मध्यम प्रकल्प सद्या जिल्हाभरात गाजत आहे. येथील पाट बंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिंदे यांनी सुरु असलेल्या कामांची माहिती तात्काळ देण्यासाठी सुकीचे उप कार्यकारी अधिकारी यांना सांगितले. पण त्यांच्या देखील आदेशाला कवडीमोल किंमत देऊन दुर्लक्षित केले जाते आहे. येथील सुकी मध्यम प्रकल्प येथे सुमारे 22 लाख रुपये खर्च करून पाटचाऱ्‍यांचे व विविध कामे होत आहे. त्यात मध्यम प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता हे येथे सुरु असलेल्या कामांची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने या कामांच्या कॉलेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कार्यकारी अधिकारी दिलदार पण
सुकी माध्यम प्रकल्प येथे सुरु असलेल्या सर्व कामांची माहिती तात्काळ देण्याच्या सूचना पाट बंधारेचे कार्यकारी अधिकारी श्री शिंदे यांनी दिल्या. परंतु त्यांच्या आदेश्याला देखिल कनिष्ठानी कवडीमोल किम्मत देऊन दुर्लक्ष केले येथील कार्यालयातील एकाने सांगिलते की कार्यकारी अधिकारी श्री शिंदे दिलदार आहे. पण आपल्याच कनिष्ठामुळे बेहाल झाले आहे.

Exit mobile version