Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग

पुणे वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली आहे. सुदैवानं कोव्हिशील्ड लस साठा सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मितीचं काम हे गेट नंबर ३, ४ आणि ५ च्या परिसरात सुरु आहे . हा भाग अत्यंत सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मांजरी परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीचं काम सुरु आहे. यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला ही आग लागली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग मोठी आहे. सध्या अग्निशमन दलाच्या १५ गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत.

घातपाताची शक्यता- आ. मुक्ता टिळक
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही घातपात तर नाही ना, अशी शंका भाजपच्या आमदार मुक्ता टिकळ यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. त्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा इमारतीलाच ही आग लागल्यानं हा घातपात तर नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.

Exit mobile version