Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीबीएसई दहावी व बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Date Sheet) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालं आहे.

सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरु आहेत. हळूहळू कोरोनातून आपण मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत असल्याचं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात सीबीएसईच्या परीक्षांचाही समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

Exit mobile version