Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीएए विरोधात ठराव मंजूर करणाऱ्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षाची भाजपातून हकालपट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्या (सीएए) विरोधात परभणी जिल्ह्यातील पालम व सेलू नगरपरिषदेत भाजपच्याच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी नगरपरिषदेत ठराव मंजूर केला होता. या दोघांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजप सरकारने नुकताच नागरिकत्व सुधारणा कायदा केला आहे. मात्र, त्यास देशातील काही राज्यांत विरोध होत आहे. हा कायदा कोणत्याही परिस्थितीत देशात राबवायचाच यावर भाजप ठाम आहे. त्यावरून माघार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. असे असतानाही भाजपच्या ताब्यात असलेल्या परभणी जिल्ह्यातील पालम व सेलू नगरपरिषदेत सीएएच्या विरोधात ठराव आणण्यात आला. पालम नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष असलेले भाजपचे बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगरपरिषदेत नगराध्यक्ष असलेले विनोद हरीभाऊ बोराडे यांनी त्यास आक्षेप घेतला नाही. उलट या ठरावाला मंजुरी दिली. त्यांच्या या भूमिकेची गंभीर दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर तातडीने हकालपट्टीची कारवाई केली आहे.

Exit mobile version