Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिरम इन्स्टिट्यूट पाच कोरोना लसींचे १०० कोटी डोस बनविणार

 

नवी दिल्ली,वृत्तसंस्था । सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशिल्ड , कोवोवॅक्स , कोविववॅक्स , कोवीवॅक, एसआआय कोवॅक्स या पाच लसींचे १०० कोटी डोस तयार करणार असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार २०२२ वर्ष उजाडण्याआधी हे डोस तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न असून यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे.

अदर पूनावाला यांनी माहिती देतांना सांगितले की, कोविडशिल्डच्या लसीपासून आम्ही सुरुवात करणार असून २०२१ च्या सुरुवातीपासून प्रत्येक तिमाहीत किमान एक लस लाँच करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. युकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या कोविडशिल्ड लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी भारतात सुरु असून जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी आहेत.

सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटीश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनेकासोबत मिळून कोरोना लस तयार करत आहे. आम्ही आधीच २ ते ३ कोटी डोस तयार करत असून ही संख्या महिन्याला सात ते आठ कोटींपर्यंत नेऊ शकतो. सध्या आम्ही मर्यादा पाहता जाणुनबुजून कमी लस तयार करत आहोत, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून यानंतर कोवोवॅक्स लसीला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. बायोटेक कंपनी नोवोवॅक्सच्या साथीने ही लस तयार केली जात आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात मे २०२० मध्ये कोवोवॅक्स लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली. २०२० च्या अखेरपर्यंत ३० हजार स्वयंसेवकांसोबत तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये सिरमच्या मदतीने १०० कोटी डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.

Exit mobile version