Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिद्धार्थ केमिकलमध्ये एकाला मारहाण

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एमआयडीसी कंपनीत असताना केमिकल कमी जास्त टाकल्याच्या कारणावरून एकाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय वाल्मीक मांडोळे (वय-५३) रा. कुसुंबा ता. जि. जळगाव हे एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कंपनीत हेल्पर म्हणून कामाला आहे. त्या ठिकाणी ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्यांच्याकडून सेंट्रल बूथमध्ये केमिकल कमी जास्त टाकण्याच्या कारणावरून नसरुद्दीन उर्फ मामू मोईन रा. सुप्रीम कॉलनी याने संजय मांडोळे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच जीवेठार मानसी देखील धमकी दिली. याप्रकरणी संजय मांडोळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात नसरुद्दीन उर्फ मामू मोईन याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करत आहे.

Exit mobile version