Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदी कोळगाव येथील सुपुत्र जवान दिपक हिरे यांना वीरमरण !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील शिंदी कोळगाव येथील जवान दीपक मधुकर हिरे यांचे मुंबईत उपचार सुरू असतांना वीरमरण आले आहे. दुपारी २ वाजता त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृह संरक्षण मंत्री अमित शहा, उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेते सनी देओल यांच्या सह अनेकांचे व्हीआयपी बॉडीगार्ड म्हणून कर्तव्य बजावणारे शिंदी कोळगाव ता. भडगाव येथील जवान दीपक मधुकर हिरे यांना शनिवारी २५ मार्च रोजी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास तळोजा (मुंबई) या ठिकाणी वीरमरण झाले. स्व.दिपक हिरे हे सन-२००२ मध्ये गांधीनगर येथे सीआरपीएफ जवान म्हणून भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे ट्रेनिंग व सैनिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनेते, उद्योगपती व राष्ट्रीय वरिष्ठ नेते यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. यामध्ये भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी, भारताचे गृहमंत्री अमित शहा, अभिनेते सनी देवल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत व्हीआयपी संरक्षण टीममध्ये अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यांनी आपल्या सेवेत देश सेवा करत आपली जन्मभूमी असलेल्या गावात सुद्धा कुटुंबातील सदस्यांना समाजसेवेचा मौल्यवान सल्ला देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याचे नेहमीच सांगत असत. स्व. दीपक हिरे यांचे आई, वडील शेतात दिवस रात्र मेहनत करून आपल्या दोन मुलांना यशस्वीपणे शिक्षण दिले. त्यापैकी दीपक हिरे यांना देशाच्या सेवेसाठी सीआरपीएफ मध्ये पाठवण्यासाठी घरच्यांनी समर्थन दिले होते.

Exit mobile version