Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधी कॉलनी रोडवर उभ्या दोन रिक्षांचे चाके लांबवली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी रोडवर उभ्या दोन रिक्षाचे लोखंडी डिक्ससह चाके लांबवल्याची घटना  उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 

जोशी कॉलनी येथील प्रेम शरद बागुल यांनी रविवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता या रिक्षा चालकाची (एमएच १९ सीडब्लु ३११५) या क्रमांकाची रिक्षा घरापासून काही अंतरावर असलेल्या कला भवनसमोर उभे केली होती. काल सोमवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन जाण्यासाठी बागुल घराबाहेर पडल्या असता त्यांना रिक्षाचे मागील चाक लोखंडी डिस्कसह चोरट्यांनी लांबविले असल्याचे दिसून आले. याच दरम्यान बागुल यांच्या रिक्षा उभ्या असलेल्या दुसऱ्या (एमएच १९ जे ७७८१) या क्रमांकाच्या रिक्षाचेही मागील बाजूचे चाक लोखंडे ट्रकसह चोरून नेल्याचे समोर आले. अशाप्रकारे दोन रिक्षांचे चार हजार रुपये किंमतीचे चाके लांबवल्याप्रकरणी प्रेम बागुल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सायंकाळी साडे सहा वाजता गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी हे करीत आहेत.

Exit mobile version