Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधी कॉलनी परिसरात गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

 

जळगाव, प्रतिनिधी । सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या पथकाने सिंधी कॉलनी परिसरातील समाधान टॉवरजवळ छापा टाकून गुटखा व सुंगधीत तंबाखु जप्त केली आहे. या प्रकरणी एकास अटक करून एमआयडीसी पोसिलांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना गुप्त बातमीदाराने सिंधी कॉलनीत गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. परिविक्षाधीन डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह सहाय्यक फोजदार आनंदसींग, जितेंद्र राजपुत, विजय नेरकर अशांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पथकास महेंद्र गोवरर्धनदास होतूमलानी (वय-५१) यांच्याताब्यात दोन गाठोडे विमल पान मसाला, व्हि-वन सुगंधी तंबाखुचा ९ हजार ९०० रुपयांचा साठा  मिळून आला. पथकाने मालासह संशयीतास अटक  असून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

 

 

Exit mobile version