Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधी कॉलनीत तरूणावर चॉपर हल्ला करणारे तिघे अटकेत; एलसीबीची कारवाई

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी येथील चेतनदास मेहता हॉस्पिटलजवळ एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-२५) रा. शिकलकर नगर, शिरसोला नाका, तांबापूरा या हा तरुण २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील सिंधी कॉलनी येथील चेतनदास मेहता हॉस्पिटलजवळ पान टपरी जवळ उभा असताना. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक तयार केले. यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाज, पोलीस नाईक प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, अविनाश देवरे यांचे पथक तयार केले. या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर संशयित आरोपी हे आसोदा रोड वरील जैनाबादजवळ असल्याची माहिती. त्यानुसार पथकाने संशयित आरोपी विक्की भगवान कोळी (वय-२४, रा. कांचन नगर), दीपक संजय साळुंखे (वय-२४, रा. बारा खोल्या प्रजापत नगर) आणि एक अल्पवयीन बालक या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तीघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९ डीएन ५२४३) व चॉपर जप्त करण्यात आला आहे. तिघांना अटक करून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version