Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता ७ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

scholarship

scholarship

जळगाव (प्रतिनिधी) सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या १० वी, १२ वी, पद व पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी ६० टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झाले आहे. अशा जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता ७ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

 

महामंडळाकडून जेष्ठता व गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधीन राहुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यानुसार 7 ऑगस्ट, 2020 च्या आत संपुर्ण कागदपत्रानिशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हतनुर कॉलनी, जळगाव येथे संपर्क साधावा. येताना सोबत खालीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत.

दोन फोटो, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version