Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्यात अजून एक नवीन कोरोना बाधीत

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । शहरात आज पुन्हा एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला असून प्रशासनाने त्याचा रहिवास असणार्‍या परिसरात सिलींगसह अन्य उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.

सावदा शहरातील बुधवारा परिसरातील ६४ वर्षाच्या पुरूषाचा कोरोना चाचणीचा अहवाल आज सकाळी पॉझिटीव्ह आला आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे. या व्यक्तीचा रहिवास असणारा भाग सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या रूग्णामुळे शहरात आजवर कोरोनाची बाधा झालेल्यांची आकडा ४५ वर पोहचला आहे. तर आजवर सात रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Exit mobile version