Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्यातील मृत बाधिताच्या कुटुंबातील चौघे कोरोना पॉझिटीव्ह

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । कोरोना मुळे मृत झालेल्या रूग्णाच्या कुटुंबातील चौघांच्या स्वॅब सँपलचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून यात तीन महिला तर एका पुरूषाचा समावेश आहे.

याबाबत वृत्त असे की, सावदा येथील गवतबाजार भागात वास्तव्यास असणारी एक महिला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत झाली होती. तिच्या कुटुंबातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येऊन त्यांचे स्वॅब सँपल्स घेण्यात आले होते. हे सँपल खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज सायंकाळी हे रिपोर्ट प्राप्त झाले असून यात मृत महिलेच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात तीन महिला आणि एका पुरूषाचा समावेश असून यातील पुरूष हा २७ वर्षाचा तर महिला या अनुक्रमे ४५, ५२ आणि ७० वर्षांच्या आहेत. या वृत्ताला वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मराठे यांनी दुजोरा दिला आहे.

Exit mobile version