Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला कोरोनाची बाधा

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा शहरात आज एकाच दिवशी चार कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर ख्यातनाम ट्रान्सपोर्ट व्यावसायिकालाही याची बाधा झाली असून याला मुख्याधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा येथे दररोज कोरोना बाधीत आढळून येत आहेत. यात आज एकाच दिवशी चार रूग्ण आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे. यात शारदा चौकातील तीन तर गांधी चौकातील एकाचा समावेश आहे. यानंतर रात्री उशीरा अजून एक रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. संबंधीत रूग्ण हा शहरातील ख्यातनाम ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून त्याचा रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर संबंधीत रूग्णाच्या रहिवासाचा परिसर असणार्‍या भागात फवारणी करण्यात आली असून हा भाग सील करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Exit mobile version