Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदे जि.प.शाळेतून दोन एलईडी टिव्हीची चोरी; भडगाव पोलीसात गुन्हा

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावदे येथील जि.प. शाळेतून दोन एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी लांबविला असून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दिपक हिम्मतराव जाधवे (वय-४५) रा. शास्त्रीनगर चाळीसगाव हे जि.प.चे शिक्षक आहे. त्यांची तालुक्यातील सावदे येथील जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सकाळी शाळेत आले होते. दुपारी शाळा बंद करून घरी निघून गेले. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शाळेत आले असता अज्ञात चोरट्यांनी १८ रूपये किंमतीचे दोन एलईडी टीव्ही चोरून नेल्याचे उघडकीला आले. यात शाळेच्या पाचवी वर्गाचे खिडकीचे गज वाकून आत प्रवेश करत मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी दिपक जाधवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पांडूरंग सोनवणे करीत आहे.

Exit mobile version