Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा शहरात पुन्हा एक नवीन कोरोना बाधीत

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आज पुन्हा एक नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला असून प्रशासनाने त्याचा रहिवास असणारा भाग सील करण्याची तयारी सुरू केली आहे.

सावदा येथे सातत्याने नवीन पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येत आहेत. या अनुषंगाने आज शहरातील संभाजी चौक भागात एक नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण असल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून संबंधीत रूग्णाचा रहिवास असणारा भाग सील करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान, आजच्या रूग्णामुळे शहरातील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ३४ इतकी झाली असून यात सहा जण मयत झाले आहेत. आजवर १४ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून १४ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Exit mobile version