Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

WhatsApp Image 2020 01 23 at 4.20.53 PM

सावदा, प्रतिनिधी | येथे हिंदुहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त बस स्टॅन्ड रस्त्यावरील राणे भंडारी कॉम्प्लेक्स च्या समोर रक्तदान शिबिर घेण्यात आले. ठाकरे यांच्या प्रतिमेचे  शहर प्रमुख मिलिंद पाटील यांनी पूजन करून कर्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

रक्तदान शिबिर रेड क्रॉस सोसायटी जळगाव , शिवसेना व युवासेना यांच्या सहकार्याने घेण्यात आले. या कार्यक्रमास आ. चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख मिलिंद पाटील, उपतालुका प्रमुख शामकांत पाटील, माजी नगरसेवक लाला चौधरी, सचिव शरद भारंबे, भरत नेहेते, अनिल लोखंडे, युवा सेना सरचिटणीस सूरज परदेशी, युवासेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, अभय पाटील प्रसिद्धि प्रमुख,अभिजीत मिटकर सचिव, मंगेश माळी, शकील शेख, गणेश माळी, शिवाजी मावळे, मंगेश माळी, वामन भारंबे, गौरव भेरवा, विकी भंगाळे, अंकित माळी आदी शिवसैनिक युवा सेना कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version