Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपरिषद संचलित श्री.नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर आणि एस. ए. जी.हायस्कूल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत रांगोळी स्पर्धा पार पाडल्या.

 

भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या स्मरणोत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या  वतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवांतर्गत तरुणांपासून ते  वृद्धांपर्यंत भारतीयांचा  गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्व जाणून घेण्याची संधी देण्यासाठी कार्यक्रमांची मालिका आखण्यात आली आहे.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम राहावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित ‘हर घर झेंडा’ अमृत अभियानांतर्गत शहरात जास्तीत जास्त ध्वज लावण्याचे नियोजन आहे.

 

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांना स्वतःच्या घरावर स्वयंस्फुर्तीने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत तसेच ज्या व्यापारी, दुकानदार,संगठना,अशासकीय संगठना, बचत गट तसेच नागरिकांना सदरील अभियान यशस्वी करण्याकरिता तिरंगा ध्वज दान करण्याची इच्छा आहे त्यानी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सावदा नगरपरिषदचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग सो.तसेच मुख्याधिकारी श्री किशोर चव्हाण सो यांनी केले आहे.

 

Exit mobile version