Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथे दिवंगत हरीभाऊ जावळे यांना आदरांजली

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांना येथील एका छोटेखानी कार्यक्रमात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सावदा येथील महानुभाव पंथिवांच्या श्री दत्त मंदिरातकै.हरीभाऊ जावळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी चिनी सैनिकांशी लढतांना शहीद झालेल्या जवानांनाही श्रध्दांजलीे वाहण्यात आली. या कार्यक्रमास दिवंगत हरीभाऊ जावळे यांचे वर प्रेम करणारे नागरीक हजर होते. कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव असल्याने हा कार्यक्रम छोटेखानी करण्यात आला. याप्रसंगी दत्त मंदिराचे प्रमुख सुरेशबाबा मानेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सुधाकर पाटील, गुणवंत भंगाळे, चंद्रकांत चौधरी, रितेश पाटील,राजेश भंगाळे, गजानन भार्गव, अक्षय सरोदे, अनिल महाजन, भरत चव्हाण, सारीका चव्हाण, सागर चौधरी, सागर भंगाळे, विनोद नेमाङे, मनिष भंगाळे, अतुल नेमाङे, संजय सरोदे, पप्पू वानखेडे, बापू भारंबे, स्वप्नील जावळे, गणेश माळी, पत्रकार प्रविण पाटील, सुरेश बेंङाळे,भोजू चौधरी, गिरीश चौधरी, तोताराम राणे यांच्यासह अनेक नागरीक उपस्थित होते. सुत्र संचालन नंदू पाटील यांनी केले.

Exit mobile version