Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सोशल डिस्टन्सींगचे पालन करत अभिवादन करण्यात आले.

महामानव, क्रांतीसुर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती संपूर्ण जगात ऑनलाइन पद्धतीने साजरी होत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणुनी थैमान घातलेला असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सार्वजनिक स्वरूपात साजरी करू शकत नाही. या अनुषंगाने कोरोना सारखा व्हायरस हा इतर नागरिकांपर्यंत पोहोचू नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी घरातच बसून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत आहेत. संचारबंदी आणि जमावबंदी कायद्याचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून सावदा शहरातील सर्व भीम अनुयायी यांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत सर्वांनी सकाळी सात वाजेला आपल्या घरांमध्ये सामूहिक त्रिशरण-पंचशील घेऊन, घरासमोर रांगोळ्या काढून, प्रत्येक घरावरती पंचशील आणि धम्म ध्वज फडकावून शांततेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली. सावदा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती चे अध्यक्ष आयु-रमाकांत तायडे कार्याध्यक्ष आयु-अनोमदर्शी तायडे, समाजसेवक आयु- बबन बडगे आयु- दे.सी. लोखंडे यांनी सकाळी सावदा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Exit mobile version