Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथील बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

सावदा प्रतिनिधी । शहरातील पंजाब नॅशनल बँके कर्मचाऱ्याचा कोराना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी कळविले आहे.

सावदा कोवीड केअर सेंटरने काही स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी एका रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आढळून आलेला ३३ वर्षीय रूग्ण हा पंजाब नॅशनल बँक कर्मचारी असून शहरातील स्वामी नारायण नगर परिसरातील रहिवाशी आहे. रहिवासी असलेला परिसर सील करण्यात आला आहे. सावदा शहरात एकुण ६१ रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी ४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. ९ रूग्णांचा मृत्यू झाला असून ५ रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली.

Exit mobile version