Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावखेडा येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम शिवारात ३५ वर्षीय तरूणावर सातपुडा जंगलातील निमळाव रस्त्यावर मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवारी घडली. 

तालुक्यातील दहिगाव गावापासुन तेथून जवळच असलेल्या सावखेडासिम शिवारात सावखेडासिम येथील राहणाऱ्या संदीप हरी बर्डे या (वय-३५) तरुणास सातपुड्याच्या जंगलातील निमळाव रस्त्यावर आपल्या शेतात कामास जात असताना अचानक आगे मोहोळा वरील मधमाशांनी हल्ला घालून शरीरावर विविध ठीकाणी जावा घेत त्यास जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. संदीप बर्डे याला जखमीवस्थेत  सावखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास घरी परत पाठवले आहे .

Exit mobile version