सावखेडा बुद्रुक येथे नेहरू युवा केंद्रातर्फे “कैच द रेन” कार्यक्रम

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव, व सावखेडा बु. ता. पाचोरा येथील युवा मंडळ, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कॅच द रेन जण चौपाल अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमात जल संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली.

 

सदरील कार्यक्रमाचे नेहरू युवा केंद्र जळगाव चे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका समन्वयक मनोज पाटील यांनी कामकाज पाहिले. सावखेडा बु” येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी गावातील युवा मंडळ तसेच वरखेडी येथील युवा मंडळ गावातील युवती मंडळ यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमनबाई वाघ ह्या होत्या, नेहरु युवा केंद्र जळगांव यांच्या वतीने राष्ट्रीय युवा स्वयंसेवक मनोज पाटील यांनी  ने. यू. केन्द्र आयोजित कार्यक्रमाची “कॅच द रेन – ३” याविषयी सविस्तर माहिती सादर करत जल संवर्धनासाठी जल प्रतिज्ञा घेण्यात आली. जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुशिला वानखेडे यांनी पाणी आणि आरोग्य दूषित पाण्याचे दुष्परिणाम यावर संवाद साधला तसेच शिक्षिका  सुषमा गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. सोबतच उपस्थितांना क्रीडा साहित्य वितरण करण्यात आले. सरपंच सुमन वाघ, ग्रामसेविका जयश्री शेलार, अंगणवाडी सेविका नंदा परदेशी यांच्या हस्ते वरखेडी येथील भगतसिंग युवा मंडळ यांना साहित्य देण्यात आले. शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रकाश पाटील, संजय सोनवणे, अनिल पाटील, राजू परदेशी यांनी भैरवनाथ युवा फाऊंडेशन मंडळ  यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देण्यात आले. अशा प्रकारे “कॅच द रेन” कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुशिला वानखेडे, शिक्षिका सुषमा गोसावी, ग्रामसेविका जयश्री शेलार, अंगणवाडी सेविका नंदाताई परदेशी, अंगणवाडी मदतनीस शोभा पाटील, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रकाश पाटील, ग्रा. पं. सदस्य अनिल पाटील, राजू परदेशी, मोतीलाल परदेशी, सामाजिक कार्यकर्ते समाधान वाघ, भावसिंग परदेशी, जयसिंग परदेशी सोबत युवा मंडळ सदस्य  मनीष सोनवणे, रोहिदास मोची, किरण परदेशी, शुभम वाघ, जयेश गायकवाड, निवृत्ती महाराज पाटील, गजनान पाटील, शुभम पाटील प्रशांत पाटील, विकास पाटील, निलेश परदेशी अविनाश वाघ, मंगेश पाटील, सचिन परदेशी, निलकंठ पाटील, वैभव परदेशी, पप्पू परदेशी, मयूर वाघ, अविराज वाघ यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content