Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावखेडा खु येथे कामधेनु दत्तक ग्राम योजनेअंतर्गत शिबिर

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील वरखेडी कार्यक्षेत्रातील सावखेडा खु. येथे कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत जि. प. सदस्य मधुकर काटे यांच्या अध्यक्षतेखाली  जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन व वंध्यत्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी सांगितले की, शेतीस पूरक व्यवसाय पशुपालन असल्याने तरुणांनी पशुपालनाकडे वळावे. पशुपालन केल्याने आर्थिक उन्नतीस मदत होते. यावेळी कर्तारसिंग परदेशी यांनी ते स्वतः पशुपालन करत असल्याने निश्‍चितच चांगली मदत होते व पशुपालनाबाबत आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन कर्तारसिंग परदेशी यांनी केले. प्रास्ताविक जळगावचे माजी सहाय्यक आयुक्त डॉ. एन. आर. पाटील यांनी केले. यावेळी युवराज पाटील, जयसिंग परदेशी (कारभारी), स्वरूपचंद बालचंद परदेशी, माजी उपसरपंच डॉ. प्रविण परदेशी, पोलिस पाटील देवीलाल परदेशी, शरद पाटील, जयंत पाटील, मस्तान तडवी, अनिल परदेशी, गणेश परदेशी, अमृत जाधव, रणजीत तडवी, माजी उपसरपंच ईश्वर नावी, वि. का. सोसायटी सदस्य गणेश परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य महारु पाटील, संजय परदेशी, बन्सी परदेशी, शिवाजी परदेशी व ग्रामस्थ व पालक कार्यक्रमास उपस्थित होते.  शिबिरात पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक आर. महाजन, डॉ. अमित पाटील (पिंपळगाव, हरेश्वर), डॉ. गवळी (लोहारा), डॉ. निलेश बारी (नांद्रा), डॉ. गौतम वानखडे, डॉ. मडावी, डॉ. संदीप पाटील, डॉ. रवि पाटील (लोहारी), डॉ. सचिन पाटील (पाचोरा), डॉ. प्रविण परदेशी (सावखेडा), चेतन पाटील, बाळू पाटील, मोहन परदेशी, प्रवीण महाले, संजय पाटील (पाचोरा) यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील (लोहटार) यांनी तर उपस्थितांचे आभार पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन यांनी मानली.

 

 

 

 

 

Exit mobile version