Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सार्वे येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

पाचोरा प्रतिनिधी । कोरोना काळात राज्य शासनातर्फे अनुसूचित जमातीच्या गरजू लाभार्थ्यांकरिता खावटी योजना सुरू करण्यात आली आहे. २ हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या सार्वे बु” ता. पाचोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पी. एन. पाटील यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली व या योजनेमध्ये दोन हजार रुपये थेट डी.बी.टी. मार्फत ३८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच ३८ लाभार्थ्यांना या किटचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगत अजूनही खावटी अनुदान योजनेसाठी अर्ज भरणे सुरू असून गरजू लाभार्थ्यांनी अर्ज करावा असे सांगितले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात आमदार किशोर पाटील म्हणाले की, राज्य सरकारच्या आदिवासी विभागामार्फत ही चांगली योजना राबविण्यात येत आहे. खावटी अनुदान च्या माध्यमातून शासनातर्फे होणारी मदत गोर गरीब लाभार्थ्यांना मोलाची ठरणार आहे. तसेच या व्यतिरिक्त आदिवासी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्याचा देखील लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करीत शिक्षक कर्मचाऱ्यांनी यासाठी अशिक्षित, पिछाडलेल्या समाजास सहकार्य करावे असे सांगितले.

याप्रसंगी एस. के. देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, अंबादास सोमवंशी, महेंद्र पाटील, भागवत पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रकल्प अधीक्षक पी. डी. मोरखेडे, मुख्याध्यापक बी. बी. पाटील, लिपिक पी. बी. निकम, शिक्षक – शिक्षिका, कर्मचारी वृंद व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version