Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सायक्लोथॉन स्पर्धा उत्सहात (व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी । उपमहापौर प्रेरित सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेत अबाल वृद्धांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत निलेश कोळी हे विजयी ठरले.

खानदेश कॉम्प्लेक्स येथून सायक्लोथॉन स्पर्धेस महापौर सौ. भारतीताई सोनवणे, भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी हिरवाझेंडा दाखवून प्रारंभ केला. सायकल चालवा…रोगराई पळवा हे ब्रीदवाक्य घेऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी असंख्य जळगावकरांनी व सायकल प्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी महापौर सौ. भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील, उपयुक्त संतोष वाहुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनोज काळे, कुंदन काळे, चंदन महाजन आदींची याप्रसंगी उपस्थित होती.

या रॅलीला खानदेश मॉलपासून सुरुवात होऊन स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, लांडोर खोरी उद्यान मार्गे पुन्हा खानदेश मॉल येथे समारोप करण्यात आला. तसेच या सायकल मॅरेथॉनमध्ये उपायुक्त संतोष वाहूळे यांनीही आपला सहभाग नोंदवला होता. उपमहापौर सुनील खडके यांनी घेतलेल्या मॅरेथॉनचे उपायुक्त यांनी कौतुक केले. या मॅरेथॉनमध्ये निलेश कोळी हे विजयी ठरले आहे. त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत मेडल देऊन गौरविण्यात देण्यात आले. तसेच सायकल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्याचा देखील याप्रसंगी गौरव करण्यात आला.

भाग १

 

 

भाग २

 

 

Exit mobile version