सामुहिक अंतरंग योग साधना कार्यशाळेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  के.सी.ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी द्वारे बुद्धपौर्णिमा आणि आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे पुण्यतिथी या निमित्ताने  अंतरंग योग साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सोहम योग केंद्राचे संचालक योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेत श्वसन ध्यान, राजयोग ध्यान, सामुहिक मंत्र साधना यांचा प्रात्यक्षिक अभ्यास करून घेण्यात आला.

 

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. पंकज खाजबागे, राहुल खरात, मेघा धनगर, महेश भालशंकर  यांचे सहकार्य लाभले. या नि:शुल्क कार्यशाळेत सोहम च्या माजी विद्यार्थांनी आणि योगप्रेमी साधकांनी सहभाग नोंदविला. बुद्ध पौर्णिमेच्या शुभ तिथीवर ही अंतरंग योग साधना घडून आल्याचे समाधान सहभागी साधकांनी व्यक्त केले. तसेच आधुनिक धावपळीच्या व्यस्त कालावधीत तणाव कमी करून, मानसिक स्वास्थ्य तसेच आध्यात्मिक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी  ही ध्यान साधना अतिशय उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया सर्व सहभागी साधकांनी  व्यक्त केल्या.

Protected Content