Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘स्व’ च्या त्रीसूत्रीचा अवलंब आवश्यक – डॉ. सोमनाथ वडनेरे

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सामाजिक दायित्व आणि व्यावसायिक हितमध्ये संतुलनासाठी “स्व: अनुशासन, स्व: नियंत्रण आणि स्व: नियमन” या त्रीसूत्रीचा अवलंब आवश्यक असल्याचे प्रतिपादन माउंट आबु येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे (महाराष्ट्र समन्वयक) यांनी केले.

माध्यमांच्या व्यावसायिक हितसंबंधांना त्याच्या सामाजिक जबाबदारीसह संतुलित करणे (बॅलन्स मिडिया कमर्शिअल इंटरेस्ट विथ सोशल रिस्पॉन्सबीलिटी) या विषयावर ते बोलत होते.

ब्रह्माकुमारीज मीडिया विंग आयोजित दि. २९ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या चार दिवसीय नॅशनल मीडिया कॉन्फरन्स मध्ये भारत, नेपाल येथून आलेले जवळपास २ हजार मिडिया कर्मचारी पत्रकाराची उपस्थिती आहे.

दि. ३० आॅगस्ट रोजी या कॉन्फरन्स च्या दुसऱ्या सत्रात “माध्यमांच्या व्यावसायिक हितसंबंधांना त्याच्या सामाजिक जबाबदारीसह संतुलीत करणे” या विषयावर डायलॉग सेशन आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्रातील जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी के. श्रीनिवास, डॉ. के. आचार्य डॉ. फिरोज खान, डॉ. भगत, डॉ. के. आचार्य, डॉ. अबिद अली, के. के. राव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. बी. के. मेघा यांनी सूत्र संचालन केले.

Exit mobile version