Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सामाजिक कार्यकर्त्या यामिनी लोहार समाज शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

 

जळगाव, प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्त्या यामिनी नरेद्र लोहार यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने विशेष समाज शिक्षिका या पुरस्काराने हेमंत अलोने यांच्याहस्ते आज सन्मानित करण्यात आले. 

 यामिनी लोहार यांनी  विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यात त्यांनी महिला सशक्तिकरण, मुलींचे लैंगिक शोषण तसेच बलात्कारीतांना समुपदेशन करणे, बालकामगार अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप,निराधारांना अन्नदान, बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, कोरोना महामारी काळात आदिवासी परिवारांना सॅनिटायझर व दैनंदिन गरजेचा किराणा वाटप, सांगली व कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना मदत उभी करणे, सोशल मीडिया, सेमिनार, रांगोळी शिबीर तसेच ब्युटीपार्लर सेमिनार आयोजित करणे यासारखे कार्य केले आहे.  त्यांच्या  उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन तरसोद जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांनी लोहार यांची पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार वितरण प्रसंगी संयोजक विजय लुल्हे, कुमूद प्रकाशनाच्या संचालिका संगीता माळी, जनजागृती महिला मंडळ जिल्हाध्यक्ष जागृती मेथाडकर, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता सिद्धपुरे, शरद महाजन, प्रकाश मिस्तरी, प्रशांत वाघ मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version