साबिया सैफिवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या : बहुजन क्रांती मोर्चाची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी । साबिया सैफी या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सामुहिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चातर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  साबिया सैफी या मुस्लिम पोलीस कर्मचारी महिलेवर आठ ते दहा जणांनी बलात्कार केला व तिच्या शरीरावर अमानुषपणे गंभीर वार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन “बहुजन क्रांती मोर्चा”  संपूर्ण देशभर ५३० जिल्हे व ३ हजार ५०० तालुक्यांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी जातीवादी व धर्मवादी सरकार आहे. याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चातर्फे निवेदन देऊन तात्काळ त्या नराधमांना अटक करून फाशी द्यावी ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी पाचोरा तहसिल कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. आणि मायनॉरिटी संपूर्ण बहुजन समाज मिळून “बहुजन क्रांती मोर्चा” मार्फत पाचोरा तहसिदरा कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. 

याप्रसंगी तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा हामीद शहा रशिद शहा यांनी नैतृत्व केले. तसेच जिल्ह्याचे पुर्णकालिन प्रचारक नंदलाल आगारे बामसेफ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष रणजीत तडवी, आर. ए. ई. पी. तालुकाध्यक्ष गफुर तडवी, बहुजन मुक्ती पार्टीचे जाकिर तडवी, आर. ए. ई. पी. चे आलेरखा तडवी, ईसा तडवी, भारत मुक्ति मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजेंन्द्र खरे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे मुकेश गांगुर्ढे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे फिरोज शाह रहिमन शाह, शरीफ शेख, बबलू शेख आदी संघटनेचे कार्यकर्ते, उपस्थित होते. हामिद शाह राशिद यांचे द्वारे काही कार्यकर्त्य समवेत पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन सुपुर्द केले.

 

Protected Content