Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सातोद ग्रामपंचायतीतर्फे गावात जंतुनाशक धुर फवारणी

यावल,  प्रतिनिधी ।  तालुक्यातील सातोद ग्रामपंचायत अंतर्गत डेंग्यू  सदृश्य पार्श्वभुमीवर संपुर्ण गावात जंतुनाशक औषधाची फॉींगींग मशिनद्वारे फवारणी करण्यात आली.

 

यावल तालुक्यात अनेक गावांमध्ये डेंग्यू,  मलेरिया आजाराचे रुग्ण वाढत आहेत.  नागरीकांमध्ये आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजीने भिती पसरली आहे. याकरीता गावात युद्धपातळीवर ग्राम पंचायतच्या माध्यमातून धूर फवारणी करण्यात येत आहे. डेंग्यू, मलेरिया डास प्रतिबंधात्मक उपाय योजना जिल्हा हिवताप अधिकारी देवराम लांडे व यावल-रावेर हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे, तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम चे आरोग्यअधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी मार्गदर्शनाखाली डेंग्यू,मलेरिया  डास  प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ग्रामपंचायतने  औषधाची फॉगिंग मशिनद्वारे केली गावात जंतुनाशक धूर फवारणी केली.  तसेच डासांच्या नियंत्रणाकरिता  ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक व ग्रामपंचायत  कर्मचारी यांनी नियोजन केले. आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने पाउले उचलत फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येत आहे.

Exit mobile version