Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सातगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

पाचोरा, प्रतिनिधी | जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथे नुकतीच आयोजित करण्यात आले. यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आले.

तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील सन:२००३ मध्ये दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम नुकतीच आयोजित करण्यात आला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा संकल्प करण्यात आले. या तंत्रज्ञान व धावपळीच्या युगात नेहमीच आपण एकमेकांशी फोनद्वारे संवाद साधतो. मात्र भेट काही प्रत्यक्षात होत नाही. यामुळे उशिरा का होईना एकमेकांना आपण भेटावे हि प्रत्येकाची इच्छा होती. त्याअनुषंगाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद, जळगाव, जामनेर या ठिकाणी असलेले मित्र सहभागी झाले होते. यावेळी मुख्या. उत्तमराव मनगटे, डी. आर. वाघ सह शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान शिक्षकांनी यावेळी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी म्हणून गजानन लाधे, सतिश लोहार, मुस्‍तकीम मन्यार, गोकुळ वाघ, भागवत माळी, संदीप पवार, सतीश पाटील, जाकीर तडवी, परमेश्वर कोळी, परसराम लाधे, तानाजी पाटील, अकबर तडवी, शेख शब्बीर, मुस्ताक शहा मस्ता शहा, रशिद तडवी (जालना), रमेश तडवी (पिंपळगाव हरे), सिकंदर तडवी (सावखेडे खु”), शरीफ तडवी (कडे वडगाव), गुलाब तडवी (पिंपरी बु”), जुम्मा शा नजीर शहा (भडगाव), गजानन बडगुजर (पिंपळगाव हरेश्वर), इंदरचंद राठोड (नांदगाव तांडा), ज्ञानेश्वर राठोड (नांदगाव तांडा), ईसा तडवी व मित्र परिवार उपस्थित होता.

Exit mobile version