Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सातगाव येथील अंगणवाडी बांधकाम साहित्य निष्कृष्ट दर्जाचे – सरपंचांची तक्रार

 

पाचोरा, प्रतिनिधी  तालुक्यातील  सातगाव (डोंगरी) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात नवीन अंगणवाडीचे बांधकाम सुरू असून या बांधकामात निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात येत असल्याचे सरपंच भरत राठोड यांच्या पाहणीत उघडकीस आले आहे. या निष्कृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी अशी मागणी सरपंच राठोड यांनी केली आहे. 

सातगाव येथे ग्रुपग्रामपंचायत असून सातगावसह गहुले, तांडा या गावांचा समावेश आहे. या गावाची सात हजाराच्यावर लोकसंख्या असून या ठिकाणी अनेक अंगणवाड्या कार्यरत आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन अंगणवाडी बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकामासाठी ज्या विटा वापरण्यात येत आहे त्या निष्कृष्ट दर्जाच्या वापरण्यात येत आहेत.  त्या विटांवर पाणी मारताच त्यांची माती होत असल्याचे सरपंच भरत सांडु राठोड,  उपसरपंच रज्जाक रमजान तडवी, सुभास पाटील, सुनील मराठे, आकाश डांबरे, डी. आर. वाघ, आकाश महालपुरे, ग्रामसेवक के. डी. पवार यांच्या पाहणीत आढळून आले आहे. शासनाचा पैसा बोगस कामावर खर्च न होता त्यातून चांगली कामं व्हावीत. भविष्यात लहान मुलांचा वावर येथे होणार असल्याने, अंगणवाडी टिकली पाहिजे असेही सरपंच राठोड यांनी म्हटले आहे. खराब विटा ताबडतोब बदलवण्यात येऊन, चांगल्या दर्जाच्या विटा आणण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. 

दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी  अंगणवाडीचे काम जर बोगस पद्धतीने होत असेल तर संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर  ठेकेदार दिपक शिंदे याने आम्ही चांगल्या विटा मागवल्या होत्या. मात्र आमच्या गैरहजेरीत खराब विटा संबंधिताने पाठवल्या. खराब विटा वापरण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे. 

 

Exit mobile version