Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साडेतीन लाखाची विवाहितेकडून मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला साडेतीन लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी पतीसह सासरकडील मंडळींकडून छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या श्रद्धा तुषार हिप्पर (वय-२३) यांचा विवाह २०१९ मध्ये मनमाड येथील तुषार ज्ञानेश्वर हिप्पर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती तुषार हिप्पर याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आल्यामुळे तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता या माहेरी रामेश्वर कॉलनी जळगाव येथील निघून आल्या. बुधवार १६ एप्रिल रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती तुषार ज्ञानेश्वर हिप्पर, मंगलाबाई ज्ञानेश्वर हिप्पर, ज्ञानेश्वर आनंदा हिप्पर  आणि अक्षय ज्ञानेश्वर हिप्पर सर्व रा. मनमाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

Exit mobile version