Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी शारदा विद्यामंदीर विद्यालयात चित्रकला स्पर्धेत चंद्रकांत नेवे प्रथम

 

यावल प्रतिनिधी ।तालुक्यातील साकळी शारदा विद्या मंदीर विद्यालयात जागतिक एडस दिनानिमित्त एचआयव्ही / एडस जनजागृती चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेत वेदांत चंद्रकांत नेवे याने प्रथम क्रमांक पटकवला आहे.

जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाले असून यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वेदांत चंद्रकांत नेवे द्वितीय क्रमांक उज्वला मंगल सोनार तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कोमल सुरेश चौधरी हिला मिळाले आहे. यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्यामंदीर विद्यालयात २७ जानेवारी रोजी जागतीक एडस् दिनानिमित्त एचआयव्ही / एडस् जनजागृतीपर चित्रकला स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केन्द्र खेल मंत्रालय, भारत सरकार व जिदंगी फाउंडेशन आणि आधार बहुउद्देशीय संस्था , अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. आज बुधवार २७ जानेवारी रोजी शाळेच्या परिसरात संपन्न झालेल्या या स्पर्धेस यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य जी. पी. बोरसे, जे. पी. पाटील (चित्रकला शिक्षक), सुश्मिता भालेराव, अजय पाटील, लिंक वर्कर अशोक तायडे, लॅब टेक्निशियन रवीन्द्र माळी , विद्यालयाचे एस. जे. पवार यांनी कामकाज पहिले. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही / एड्स या संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एड्स जनजागृती चित्रकला स्पर्धेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version