Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी येथे पिसाळलेल्या माकडाचा हैदोस

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या माकडाचा हौदोस सुरू असून हे  माकड गावात गायीच्या व इतर ढोरांच्या शेपटी पकडून चावा घेत  असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यात सैरभैर पाळणाऱ्या गुरांमध्ये कोणी आल्यास अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याने या माकडाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

 

याबाबत माहिती असे की, साकळी गावात गेल्या मागील काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने थैमान घातला आहे. या माकडाने गावात अक्षरशः हौदोस मांडला आहे.  हे माकड गावात ज्या भागात जाईल त्या भागातील गुरा-ढोरांच्या मागे लागून त्यांना चावा घेत आहे. त्यामुळे हे ढोरे गंभीरपणे जखमी होत आहे. जर या माकडाने एखाद्या मोकळ्या फिरत असलेल्या गुरांवर हल्ला चढविला तर ही गुरे  माकडाच्या भितीने दिसेल त्या रस्त्याने सैरावैरा पळतात.  या सैरावैरा पळत असलेल्या गुरांमध्ये कोणी लहान मुले, महिला, वयोवृद्ध व्यक्ती आल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो.  या माकडाच्या दहशतीमुळे ग्रामस्थ  खूप धास्तावले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये शनी मंदिर भागातील वसंत काशिनाथ बडगुजर, पवन रवींद्र बडगुजर,  श्रावण भिका बडगुजर, ग्रा.पं. सदस्य साहेबराव बडगुजर, किशोर बडगुजर, बापू मराठे, भगवान बाबुराव बडगुजर या ग्रामस्थांच्या गुरांवर  विशेषतः बऱ्याच गायींवर  या माकडाने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे.  दरम्यान, पंचायत समिती सदस्य दीपक अण्णा पाटील यांनीही यावल वन विभागाशी संपर्क साधून पिसाळलेल्या माकडाचा त्वरित बंदोबस्त करण्यासंदर्भात सांगितले आहे.  जखमी सर्व गुरा-ढोरांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज पाटील तसेच डॉ. वाय.जी. नेवे यांनी उपचार केले आहे.

दरम्यान, यावल वनविभागाचे अधिकारी विशाल कुटे यांनी  सांगितले की,  साकळी गावातील  काही  ग्रामस्थांनी  व पदाधिकाऱ्यांनी या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठीची मागणी केलेली आहे. त्यानुसार या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी  उद्या शनिवार दि. १४ ऑगस्ट  रोजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना साकळी येथे पाठवुन त्या माकडाला जेरबंद करण्यात येईल. असे

 

Exit mobile version